पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |पहूर कसबे येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.
शाळेच्या प्रांगणात झालेल्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भुषविले. प्रारंभी विद्यार्थ्यांनीनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किर्ती बाबुराव घोंगडे ( जि.प.कन्या शाळा पहूर कसबे), जिनीयस मास्टर्स फाऊंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती रत्नमाला काथार (संतोषीमाता नगर जि.प.शाळा), गोपाळ सपकाळ (जि.प.शाळा, खर्चाणे) तसेच आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार प्राप्त विजय सरोदे, पीएचडी पदवीप्राप्त डॉ . ज्योती फकीरा चौधरी (आर.टी.लेले हायस्कूल), तायक्वांदो स्पर्धेत प्रथम विजेतेपदप्राप्त हरीभाऊ राऊत (सावित्रीबाई फुले विद्यालय) या नवोपक्रमशील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
यावेळी गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा, रामचंद्र वानखेडे, रूपाली माळी आदिंनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांनी केले. यावेळी जि.प.सदस्य राजू पाटील शहापूर, पं.समिती सभापती जलील तडवी, उपसभापती पूजा भडांगे, पहूर पेठच्या सरपंच नीता पाटील, कसबेच्या सरपंच आशा जाधव, चंद्रकांत बावस्कर, नवल राजपूत, एस.एस.गावंडे, उपसरपंच शाम सावळे, राजू जाधव, लक्ष्मण गोरे, शंकर जाधव, मधुकर पवार, ग,स.सोसायटीचे संचालक अनिल गायकवाड, सलीम शेख, पत्रकार शरद बेलपत्रे, गणेश पांढरे, किरण जाधव, एन.पी.जोहरे, मधुकर लहासे, संतोष पाटील, विनोद पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
यशस्वीतेसाठी सुनिल कोळी, श्रीकांत पाटील, गणेश राऊत, रमेश पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, हितेंद्र जाधव, निलेश गोरे, प्रकाश घोंगडे यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी आभार मानले.