अहमदाबाद-वृत्तसंस्था | जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून असलेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू झाला असून यात कांगारूंना टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आज फायनल मॅच खेळली जात आहे. यात नेमकी बाजी कोण मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. जगातील सर्वात मोठे असणारे हे स्टेडियम तुडुंब भरले असून खुद्द पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांची मांदियाळी देखील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेली आहेत.
दरम्यान, सामनाच्या आधी नाणेफेक झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमीन्स याने नाणेफेक जिंकली. यात त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता भारतीय फलंदाजी आधी होणार आहे.