प्रा.डॉ. विलास बोरोले यांना पीएचडी प्रदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.विलास बोरोले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या वतीने पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

प्रा.बोरोले यांनी ‘एंटीकॅन्सर पोटेन्शियल ऑफ सलेसिया ऑब्लोंगा ऑन एक्सप्रिमेंटल ॲनिमल’ या विषयावर संशोधन करून शोधप्रबंध सादर केला होता. त्यासाठी त्यांना डॉ.पी.एस.लोहार, चोपडा यांचे मार्गदर्शन लाभले होते. शोध कार्य यशस्वी रित्या संपन्न केल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते पीएच.डी प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा.विलास बोरोले यांनी मिळविलेल्या यशामुळे तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, एनमुक्टो प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकारी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन व शुभेच्या देवून गौरव करण्यात येत आहे .

Protected Content