गांधीजींच्या चष्म्यांचा लिलाव

 

लंडन, वृत्तसंस्था । इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये शुक्रवारी लिलाव झाला. या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये इतकी किंमत मिळली. ४ आठवड्यांपूर्वी चष्म्यांची ही जोडी एका लिलाव कंपनीच्या टपाल पेटीत आढळून आली होती.

युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले. एका अमेरिकन व्यक्तीने ज्याला जुन्या वस्तू जमवण्याचा छंद आहे, त्याने हे चष्मे विकत घेतले . ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या टपाल पेटीत एका व्यक्तीने एका चिठ्ठीसह हे चष्मे टाकले होते. यातील चिठ्ठीत त्यानं म्हटलं होतं की, स्वतः गांधीजींनी त्यांच्या काकांना सन १९२० मध्ये दक्षिण अफ्रिकेत असताना हे चष्मे भेट दिले होते. गरजवंतांना स्वतःजवळील वस्तू भेट देण्याची गांधीजींची ही वृत्ती सर्वांनाच माहिती आहे.

गांधींजी जेव्हा सन १८००च्या शेवटी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेत होते. तेव्हा ते अशा प्रकारच्या गोल काचांचे चष्मे वापरत होते. त्या काळात अशा डिझाईनचे चष्मे वापरले जात होते. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतही गांधीजींनी अशाच प्रकारचे चष्मे वापरले. त्यामुळेच गोल काचांचा चष्मा हा आजही गांधीजींची ओळखच बनला आहे.

Protected Content