मुक्ताईनगरात प्रा.ज.फाउंडेशनतर्फे स्वच्छता अभियान

muktainagar 1

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधीजींच्या स्वच्छता अभियानास प्रेरित होऊन जळगाव येथील प्राही जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद तुकाराम पाटील यांनी राज्यातील व गावागावातील स्वच्छतेचे काम अंगीकारून ‘मिशन स्वस्थ भारत अभियान’ व ‘मिशन एक घर, एक वृक्ष’ हा उपक्रम चालू केला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, प्रत्येक तालुक्यातील 20 ते 25 होतकरू व गरजू बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केले आहे. या अभियानाला गाव-खेड्यातून जोरदार प्रतिसाद मिळतांना दिसत असून प्राहि जननही फाऊंडेशनच्या मिशन स्वस्थ भारत अभियाना अंतर्गत विनोदपाटील यांनी घेतलेल्या प्रेरणेतून गावातील गरजू आणि सर्वसाधारण कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दवाखान्यातील खर्चामध्ये काही ना काही प्रमाणात सुट मिळवून देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. तसेच संस्थेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून गावातील कुटुंबांना ‘मिशन स्वस्थ भारत अभियान’ व ‘मिशन एक घर एक झाड’ याबद्दल सविस्तर माहिती दिली जात आहे.

 

माहिती देऊन स्वस्थ कार्ड बनवण्याचे काम या बेरोजगार मुलां व मुलींकडून ही संस्था करीत आहे. तसेच या कार्डधारकांना जिल्ह्यातील संलग्न असलेल्या हॉस्पिटल व पॅथॉलॉजी लॅबने काही सूट ही मंजूर करून दिलेली आहे. ती कार्डधारकांना मिळवून देत मिशन स्वस्थ भारत अभियान सफल करण्यास ही संस्था प्रयत्न करीत आहे. तसेच पर्यावरण संतुलनाचा उद्देशाने एक घर एक वृक्ष हा कार्यक्रम देखील संस्था राबवत आहे. यात मिशन स्वस्थ भारत अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या प्रत्येक कार्डधारकांच्या घरासमोर एक झाड स्वतः संस्था देऊन कार्डधारकांच्या घरासमोर ते लावण्यात येईल तसेच प्रत्येक झाड हे वाढवण्यास कार्डधारक व संस्था प्रयत्नशील राहील अशाप्रकारे प्राही जनहित फाऊंडेशनचे कार्य मुक्ताईनगरच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. व अशा उपक्रमाची संपूर्ण जिल्हाभरातून अधिकारी व जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाकडून प्रशंसा होत आहे व या मिशन स्वस्थ भारत व मिशन एक घर एक वृक्ष यामध्ये नागरिक जास्तीत जास्त प्रमाणात भाग घेताना दिसत आहे.

Protected Content