विवाहितेला पैशांच्या मागणीसाठी फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरुन पैसे आणावेत या मागणीसाठी तिच्या पतीसह सासरच्यांनी फिनाईल पाजून तसेच गळफास देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सहा जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, पिंप्राळा येथील वर्षा हेमंत सोनार यांचा २०१३ मध्ये मुंबईमधील अंबरनाथ येथील हेमंत सोनार यांच्या विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पतीसह हेमंत सोनार यांच्यासह दीर तसेच नणंद , नंदोई यांनी वर्षा हिस माहेरुन गाडी घेण्यासाठी तसेच इतर कामासाठी माहेरुन पैसे आणावे, अशी मागणी केली. या कारणावरुन वर्षा हिस वेळावेळी शिविगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान काळात पती हेमंत सोनार यांनी वर्षा हिस गळफास देण्याचा तसेच फिनाईल पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे पतीसह इतरांनी वर्षा हिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून वर्षा माहेरी जळगाव शहरातील पिंप्राळा येथे आल्या. व काल बुधवारी पतीसह इतरांविरोधात रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात पती हेमंत रमेश सोनार रा. अंबरनाथ मुंबई,, नणंत संगीता गजानन दुसाने, मनिषा दिनेश विसपुते, सविता राजेंद्र विसपुते, नंदोई राजेंद्र बबन विसपुते चौघे रा.पिंपळकोठा ता. एरंडोल, दीर शाम रमेश सोनार रा. अंबरनाथ मुंबई, या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी करीत आहेत.

Protected Content