आपत्कालीन निःस्वार्थी समाजसेवा म्हणजे राष्ट्रसेवाच होय — मिलिंद विचारे

जळगाव, प्रतिनिधी  ।  आपत्कालीन निःस्वार्थी सेवा म्हणजे नागरिकांची अमुल्य राष्ट्रीय सेवाच आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध शिवचित्रकार मिलिंद विचारे यांनी केले. ते सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे यांनी पिताश्री सुपडू सुतार यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. 

 

सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे यांनी पिताश्री सुपडू सुतार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ जून  रोजी जळगाव येथील विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळास देणगी दिली. कार्यक्रमाच्या औचित्याने चित्रकार सुनील दाभाडे यांनी कै.सुपडू  सुतार यांच्या केलेल्या पेंटिंगचे अनावरण शिवचित्रकार विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.  अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव असून प्रमुख अतिथी राजाराम लुल्हे, मनोहर रूले,सुनील दाभाडे ,सिंधु सुतार, सौ.इंदुमती लुल्हे, संजय वाघ उपस्थित होते.  संयोजक विजय लुल्हे पिताश्री कै.सुपडू सुतार यांच्या गौरवार्थ म्हणाले की, तत्वनिष्ठता, निर्भयता, समायोजन शीलता, कर्तव्यतत्परता व कलासक्ती ही त्यांच्या समर्पणशील कार्याची यशस्वी पंचसुत्री होती. पितृऋण व सामाजिक उत्तरदायित्वाने पांचाळ सुतार समाज वस्तीगृहाच्या बांधकामासाठी विजय लुल्हे यांनी अकरा हजार देणगीचा धनादेश मातोश्री श्रीमती सिंधु सुतार यांच्या हस्ते मंडळाध्यक्ष अरुण जाधव यांना  सुकन्या सुवर्णा लुल्हे व समिक्षा लुल्हे  यांच्या उपस्थितीत प्रदान केला.कार्यक्रमास एम.टी.लुले साहेबांचे मार्गदर्शन मिळाले. कै.सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ औषधी वनस्पतींच्या लागवडीसह रोपदान व ग्रंथ भेट वस्तीगृहाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली.  पुस्तक दिनाला भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव साठी १२०० रुपयांचे मान्यवर लेखकांची दर्जेदार ग्रंथ भेट दिले. अध्यक्षीय भाषणात अरुण जाधव म्हणाले की,” पितृछत्र कोरोनाने हिरावले. उपचारात कर्जबाजारी झाले तरी संकटे विसरत बांधकामास देणगी देऊन पिताश्रींचा गुणात्मक वारसा विजय लुल्हे चालवत असल्याबाबत जाधव यांनी लुल्हेंची प्रशंसा केली. प्रस्तावना व आभार विजय लुल्हे यांनी केले. यशस्वितेसाठी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, प्राचार्य राजेंद्र महाजन, अभियंता संजय भावसार, मनोहर बाविस्कर, संजय वाघ, शिरीष चौधरी, बाळकृष्ण मिस्तरी यांनी अमूल्य सहकार्य केले.

 

Protected Content