लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील एका २५ वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असुन अत्याचार करणाऱ्या इसमा विरुध्द पिडीत महिलेने पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील तलाठी कॉलनीतील रहिवाशी निलेश दिलीप बोरसे (वय-२६) याचे शहरातीलच एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत जवळीक साधत अत्याचार केला. तसेच या संबंधीत फोटो व व्हिडिओ काढुन ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ऑक्टोबर – २०२० ते ऑगस्ट- २०२१ या दरम्यान फिर्यादी महिलेच्या घरी, बॅंगलोर (कर्नाटक) व पुलगाव (जि. वर्धा) येथे नेवुन वारंवार अत्याचार केले. शेवटी पिडीत महिलेस आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पिडीतीने पाचोरा पोलिसात धाव घेत निलेश दिलीप बोरसे याचे विरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक भारत काकडे हे करीत आहेत.

Protected Content