न्हावी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची माहीती देण्यास टाळाटाळ : भीम आर्मीचा आंदोलनाचा इशारा

यावल अय्युब पटेल । तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायती अंतर्गत दलीत वस्ती सुधार योजनेत बोगस व निकृष्ट कामे तसेच ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचारी कारभारातुन झालेल्या विविध विकास कामांची माहिती न दिल्याने बेमुदत ठिय्या आंदोलनाचा  इशारा भीमआर्मीतर्फे देण्यात आला आहे. 

 

निवेदनाचा आशय असा की,  न्हावी तालुका यावल ग्रामपंचायतीला लाभलेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजवर ६० लक्ष रुपयांच्या निधीतून विविध कामे झाली आहेत. यात  ग्रामस्तरावर यशवंत बोरोले यांच्या वाडयापासुन पवन मिस्त्री ( रोझोदा रोड ) यांच्या घरापर्यंत स्वच्छतेचा विचार करून वाढते घाणीचे साम्राज्य बघता ओतीव गटारीच्या झालेल्या कामांची माहीती,  महीला शौचालय , समाज मंदीर आदी कामांची सविस्तर माहिती तसेच ठरावीत झालेल्या कामांचे अंदाजपत्रक व आराखडा आदींबाबत भिमआर्मीच्या वतीने सात दिवसांपूर्वी म्हणजेच दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले होते. परंतु, याकडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत.  त्यामुळे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व उपस्थित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट यांच्या वतीने न्हावी येथील ग्रामपंचायती समोर दि.१५ सप्टेंबर रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तत्काळ मागणीची पूर्तता करण्यास कार्यवाही करावी अशी विनंती असे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे . याप्रसंगी भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव, राज्यप्रवक्ता रमाकांत तायडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे, भीमआर्मीचे यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे , तालुका महासचिव प्रशांत तायडे, यावल येथील भीम आर्मीचे सदस्य मंथन महीरे, बाबु सुरवाडे आदी प्रमुख पदधीकारी व कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते . दरम्यान न्हावी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवुन विकासकामे करण्यात आली असुन , माहीती प्राप्त झाल्यावर सत्य समोर येईल असा विश्वास भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदानशिव यांनी व्यक्त केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4321017981315122

 

Protected Content