अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबीर उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय व संरक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गंगाराम सखाराम हायस्कूल यांच्या सभागृहात स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्मिताताई वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल शांताराम पाटील तालुकाध्यक्ष कृ.उ.बा.स.संचालक)तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले .

प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती.प्रेमलता पाटील यांनी केले तर उपस्थित महिलांना आ.ताई साहेब स्मिताताई वाघ व . हिरालाल शांताराम पाटील यांनी मार्गदर्शन केले.तसेच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या योजनांन बद्दल माहिती दिली . व संरक्षण अधिकारी श्रीमती. योगिता चौधरी यांनी महिलांवर होणार्‍या अन्याय व अत्याचारा बद्दल महिलांच्या कायद्यां बद्दल माहिती दिली.

या प्रसंगी सभागृहाच्या बाहेर शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावून त्या ठिकाणी महिलांच्या समस्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती.भाग्यश्री पाटील व श्रीमती.सुजाता चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती. अल्का पाटील,श्रीमती.संगीता पगारे, श्री.अरुण बोरसे,समाधान पाटील पगार,किरण बडगुजर . भानुदास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content