कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : इंदोरीकर महाराज

indorikar maharaj1

 

शिर्डी (वृत्तसंस्था) समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी, असे इंदोरीकर महाराजांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशुभ वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.

Protected Content