नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय होणार याकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे लक्ष लागले असतांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना रिपाइंच्या आठवले गटात येण्याची पुन्हा एकदा ऑफर दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्य १ ऑगस्ट रोजी होणार्या सुप्रीम कोर्टातील निकालावर अवलंबून आहे. यामुळे या निकालाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. कालच, शिवसेनेकडून सेनेतल्या फुटीर आमदारांसमोर विलीनीकरण हाच पर्याय असल्याचं संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत पुन्हा सांगितलं. तर, दुसरीकडं आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे गटाने आमच्या पक्षात विलीन व्हायचा निर्णय घेतल्यास स्वागत करु, असे म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी आधी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले असतील असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमिवर, त्यांनी पुन्हा एकदा हीच ऑफर शिंदे गटाला दिल्याचे दिसून येत आहे.