लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून माझे तिकीट फायनल झाले होते – लक्ष्मण हाके

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून माझे तिकीट फायनल झाले होते, असा गौप्यस्फोट ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्या वेळी शरद पवार यांनी देखील आपल्याल तिकीट देण्याची भूमिका घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, वेळेवर तिकीट मिळाले नाही त्यामुळे त्यांनी माढा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला नाकारले असल्याचा प्रश्न पत्रकारांनी लक्ष्मण हाके यांना विचारला होता. मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या मतदारसंघात मला 5 हजार मते मिळाली असल्याचे हाके यांनी सांगितले. आपला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे ही भावना अद्यापही तेथील समाजात नसल्याचे हाके यांनी म्हटले आहे. धनगराने खासदार व्हायचे असते का? त्याने तिकीट मागायचे असते का? असा प्रश्न विचारले जात असून ही समाजातील फॅक्ट असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही निवडणुका लढवल्या होत्या मात्र, त्यांनाही पराभव पत्कारावा लागला असल्याचे हाके यांनी सांगितले.

Protected Content