आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषद सदस्यांवर लक्ष

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि त्यांचे वडील तथा माजी आमदार गोपीकिशान बाजोरिया हे शिंदे गटात दाखल झाले आहेत.

अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे सुपुत्र विद्यमान विधान परिषद आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात हा प्रवेश झाला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांमध्ये उभी फूट पाडून नवीन गटासह सत्ता स्थापन केली. यानंतर त्यांनी शिवसेना खासदार आणि पदाधिकार्‍यांना आपल्या सोबत घेतले. तर आता त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यांना टार्गेट केल्याचे यातून दिसून आले आहे. आता विधानपरिषदेच्या अन्य सदस्यांनाही ते सोबत घेणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे. असे झाल्यास शिवसेनेला विधानपरिषदेतही धक्का बसणार आहे.

Protected Content