जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण विश्वाला आपल्या काव्यसृष्टीने मोहित करणारे संस्कृत महाकवी कालिदास जयंतीनिमित्त येथील ए.टी.झांबरे विद्यालयात नुकताच कथाकथन, श्लोक पठणाद्वारे महाकवी कालिदास यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता १० वी ब आणि क तुकडीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतूनच केले. सूत्रसंचालन कृष्णगिरी, सोनवणे, सुजल चौधरी, कौशल बारी, हेताक्षी बारी या विद्यार्थ्यांनी केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मुलांमध्ये महाकवीं प्रमाणेच तुम्हीसुद्धा सर्वदूर प्रसिद्धी मिळवू शकतात. असा आशावाद निर्माण केला. पर्यवेक्षक एन.बी.पालवे सरांनी विद्यार्थ्यांना कालिदासाप्रमाणे काव्यरचना करण्याची प्रेरणा दिली.संस्कृत भाषा शिक्षक वेदप्रकाश आर्य यांनी कालिदासांचा जीवनपरिचय देऊन कालिदासांप्रमाणे सद्गुण धारण करण्याची प्रेरणा दिली.कार्यक्रमात एकूण २८ विद्यार्थ्यांनी संस्कृत कथाकथन व श्लोक पठणातून महाकवींच्या आठवणी जागविल्या.
कौशल गोपाल बारी याने संस्कृत भाषेतून ऋणनिर्देशनाने कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक सतीश भोळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.