प. वि. पाटील विद्यालयात नवीन वर्षाचे स्वागत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात नववर्ष २०२२ आगमनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझर व विविध नियमांचे पालन करण्याचा संदेश या वेळी विद्यार्थ्यांनी दिला तर  निरोगी शरीर राखण्यासाठी माझे आरोग्य चांगले ठेवीन , बाहेरील पदार्थ गरज भासली तरच खाणार, मी जे काम करीन ते व्यवस्थितच करणार , आपल्या अभ्यासाच्या व कामाच्या वेळा ठरवून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणार, दररोज किमान 20 ते 25 मिनिटे चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करणार ;असा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

सुंदर अशी सजावट करून विद्यार्थ्यांनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहाने केले तर सरलेल्या वर्षाला निरोप सुद्धा या वेळी दिला. आपण ज्या चुका मागील वर्षी केल्या त्या पुन्हा आपल्या हातून होणार नाहीत असा निर्धारही केला.

कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव तसेच स्वाती पाटील यांनी केले तर मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content