भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती, नगरपालिकेला दुरूस्तीबाबत निवेदन देण्यात आले. त्यावेळी लवकरात लवकर या परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन नगरपालिका प्रशासनाने दिले.
भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती. पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर मधील मिलिंद बोरसे, मयूर पाटील, सुशांत पाटील, शुभम पाटील, धीरज नेरपगार, अभिजीत पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाकडे 2 वेळेस पाठपुरावा करून रस्त्याच्या संदर्भात निवेदन ही दिले होते. पण नगरपालिका प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. गेल्या काही दिवसात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातामध्ये वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांना तरुन यूवक यांनी आव्हान करत मागील वर्षी नागरिकांसमवेत स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली होती. सम्बधित प्रकार मुख्याध्याधिकाऱ्यांनी समजल्यावर त्यांनी या वर्षी देखील एकवीरा नगर वासीयांना 15 व वित्त आयोगातून तुमचं काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे परिसरातील नागरिक नगरपालीका प्रशासनाने दिलेले आश्वासन कधी पुर्ण होईल ? याकडे लक्ष ठेऊन आहेत.