भडगाव शहरात अवजड वाहनांना बंदी करावी-मुख्याधिकार्‍यांना निवेदन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगांव शहरात मेनरोडवर अवैधपणे रस्त्याच्या मधोमत अवजड वहाने उभी करुन रस्ता ब्लॉक करण्यार्‍या वाहनांवर त्वरित बंदी करावी अश्या आशयाचे निवेदन अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष दिनेश महाजन यांनी आज मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना आज दिले.

निवेदनात नमूद केले आहे की,भडगांव शहरात बाजार चौक, नगरपरिषद येथे ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे मेन रोड, परंतु या रस्त्यावर ट्रान्स्पोर्टचे ट्रक, बोलेरे छोटा हत्ती यांच्या मधे अवजड माल वाहतुक होत असते. यामुळे शाळेतील मुले, अबालवृद्धना नाहक त्रास सहन करावा लगतो. यामुळे अनेकदा ट्राफिकच्या समस्या उत्पन्न होतात तरी आपण आश्या अवजड वाहनांना त्वरीत बंदी करुन रस्ता सर्वसामान्य माणसांसाठी मोकळा करावा.अवजड वाहनांवर त्वरित बंदी न केल्यास अखिल भारतीय सेना. भडगाव तालुका यांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले आहे.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष अध्यक्ष दिनेश महाजन यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, तहसिलदार भडगाव, पोलिस निरीक्षक भडगाव यांना पाठविण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: