Home Cities भडगाव नवनियुक्त पीएसआय प्रताप पाटील यांचा आहेर सुतार समाजाकडून सत्कार

नवनियुक्त पीएसआय प्रताप पाटील यांचा आहेर सुतार समाजाकडून सत्कार


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव येथील पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रताप पाटील यांचा आहेर सुतार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस ठाणे परिसरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रताप पाटील यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी भडगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून, त्यांची बदली नाशिक आणि जळगाव येथून भडगाव येथे झाली आहे. यापूर्वी त्यांनी चाळीसगाव, भुसावळ, पारोळा आणि पाचोरा येथे कर्तव्य बजावले आहे. कर्तव्यदक्ष व अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

कार्यक्रमात दक्ष पोलीस टाइम्सचे राज्य प्रतिनिधी बापूराव शार्दुल यांनी बोलताना भडगाव परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी पोलीस व समाज यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्कारानंतर बोलताना पीएसआय प्रताप पाटील यांनी भडगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. शहर गुन्हेमुक्त ठेवण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणतीही समस्या उद्भवल्यास नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी सुरेश मिस्तरी, बापूराव शार्दुल, दीपक वाघ, किरण देवरे, शरद निकम, ईश्वर देवरे, दीपक गवळे, मनोज शार्दुल, मनोज जाधव, एकनाथ खैरनार आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound