मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर व्यापार्यांनी आधी दिलेला इशारा रद्द करून आता सोमवार पासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात राज्यातील व्यापार्यांनी उद्या ९ तारखेपासून दुकानं उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र या निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. यामुळे आता व्यापार्यांनी उद्या नव्हे तर सोमवार पासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.