Home क्राईम तरूणीवर अत्याचार : धरणगावच्या इसमाविरूध्द जळगावात गुन्हा दाखल !

तरूणीवर अत्याचार : धरणगावच्या इसमाविरूध्द जळगावात गुन्हा दाखल !

0
9


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील एका तरुणीला कामाच्या निमित्ताने संपर्कात आणून तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी धरणगाव येथील एका इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दाखल फिर्यादीत नमूद केले आहे की, पीडित तरुणी ही काही वर्षांपासून एका महिला नाशिक येथे राहत असून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. फेब्रुवारी महिन्यात ती कामानिमित्त जळगावात आली असताना कोर्ट परिसरात तिची ओळख धरणगाव येथील सुनील मधुकर चौधरी यांच्यासोबत झाली. संबंधिताने स्वतःचा प्रॉपर्टी विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. काम असल्यास संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. यानंतर त्याने अलीकडच्या काळात सदर तरूणीला वारंवार एसएमएस करून तिच्याशी सलगी वाढविली.

दरम्यान, त्या महिलेला घर भाड्यासाठी पाच हजाराची आवश्यकता असल्याने तिने चौधरी यांच्याकडे ऊसनवार मागितले. पैसे देण्याचे कारण सांगून त्याने पीडितेला जळगाव येथे बोलावले. दि.२४ जून रोजी दुपारी १.३० वाजता शहरातील सागर पार्क येथे त्याने बोलावले. तेथे तिला कारमध्ये बसवून त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणालाही सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ तसेच ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन राणशेवरे करीत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound