यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील महेलखेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अशोक तायडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्राम पंचायत महेलखेडीच्या ग्रामस्थांच्या वतीने अशोक तायडे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, सरपंच परिषद या संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष व कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, महेलखेडी ग्रामपंचायतच्या सरपंच शरिफा तडवी, रवींद तायडे, किसन तायडे, माजी उपसरपंच माया महाजन, जयंता पाटील, ग्राम पंचायत सदस्या शामिना पटेल, विजया महाजन, नामदेव झुरकाळे, सुदाम पाटील, अर्जुन महाजन, पराग महाजन, प्रभाकर महाजन, दिनकर पाटील, प्रमोद महाजन, अब्दुल देशमुख, फत्तू पटेल,अनिस पटेल, भरत तायडे, सत्तार तडवी, आशिष झुरकाळे, सोपान तायडे यांच्यासह ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी व गावकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेलखेडीच्या उपसरपंचपदी अशोक तायडे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थानी केला नागरी सत्कार
1 year ago
No Comments