यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील युवा सामाजीक कार्यकर्ते तथा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल पाटील यांच्या आदेशाने यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अॅड. देवकांत पाटील यांची पदवीधर संघावर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रवीन्द्र भैय्या पाटील, पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते, जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, वसंत गजमल पाटील, सुकदेव नाना बोदडे, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, अय्युब खान सर, गनी शेख, सईद शेख रशीद, अरूण लोखंडे, कामराज घारू, अब्दुल करीम मन्यार, महीला आघाडीच्या द्वाराका पाटील, सुरेखा पारधे, मनोहर महाजन, अॅड. निवृत्ती पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिताराम पाटील, गिरधर पाटील, फैजपुरचे अन्वर खाटिक आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहे.