रावण काळाच्या पडद्याआड : अरविंद त्रिवेदींचे निधन

मुंबई | टीव्हीवरील लोकप्रिय मालिका रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी ( वय८२) यांचे निधन झाले. काल रात्री त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला होता. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली. मात्र रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील रावणाच्या भूमिकेमुळे त्यांना तुफान लोकप्रियता लाभली. या भूमिकेने त्यांना अजरामर केले.

अरविंद त्रिवेदींनी सुमारे ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले होते.

Protected Content