एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारीपदी अरूण पवार यांची नियुक्ती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून अरूण प्रभाकर पवार यांची नेमणुक करण्यात आली आहे.

 

यावल येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयात मागील ४ वर्षांपासून प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विनिता सोनवणे यांची नाशिक येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे.  त्यांच्या जागेवर पुणे जिल्ह्यातील पेण येथील आदीवासी विभागात सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( प्रशासन ) म्हणुन कार्यरत असलेले अरूण प्रभाकर पवार यांची पदोन्नतीवर यावल येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. लवकरच ते आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदीवासी विभागाने राज्यात १० सेवा पदोन्नतीवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बढतीवर बदलीचे आदेश ११ जुलै २०२३ रोजी आदीवासी विभागातील कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य पवनकुमार बंडगर यांनी काढले आहे.

Protected Content