यावल वकील संघाचा आंदोलनास पाठींबा

यावल ( प्रतिनिधी) शासनाने वकीलांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात या मागणीसाठी राज्यातील सर्व वकील संघांनी पुकारलेल्या आंदोलनास येथील वकील संघाने आपला पाठींबा एका निवेदनाव्दारे जाहीर केला आहे. या संदर्भात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. निवृती पी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

दिल्ली येथे दिनांक २/२/२०१९ रोजी बार काउंलसिल ऑफ इंडीया व उच्च न्यायलय वकील संघ आणि राज्यातील सर्व राज्य वकील परिषद यांनी वकीलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासंदर्भात तसा ठराव पारित केला असुन, तशी तरतूद बजेटमध्ये करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय पातळीवर दिनांक १२/२/२०१९ रोजी आंदोलन छेडले आहे. या मागणीला पाठींबा म्हणुन यावल वकील संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर सचिव अॅड. के. डी. सोनवणे, अॅड. नितिन चौधरी, अॅड. के.डी. पाटील, अॅड. खालीद शेख, अॅड. धिरज चौधरी, अॅड सुरळकर, यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. नायब तहसीलदार एस. जी. माळी यांनी हे निवेदन स्वीकारले.

Add Comment

Protected Content