ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी यावल पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील येथील पंचायत समितीच्या आवारात ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामरोजगार सेवक संघाच्या वतीने  एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ग्राम रोजगार सेवकांची एकुण संख्या ही २८ हजार१४४ असुन यावल तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांची संख्याही ६७ असुन , राज्य शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतुन ग्रामरोजगारांच्या नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे . त्यानुसार २००६सालापासुन राज्यातील २८ हजार१४४ ग्रामरोजगार सेवक हे ६० टक्के मानधनावर कार्यरत आहे . ग्रामरोजगार सेवक हे मागील पंधरा वर्षापासुन ग्रामपंचायत पातळीवर ग्राम पंचायत पॅनलच्या माध्यमातुन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये सत्तांतरच्या सुडबुद्धीने जाणीवपुर्वक कामावरून कमी करून अन्याय केला जातो यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते , यासंदर्भात ग्रामरोजगार सेवकांच्या मागणीनुसार ग्रामरोजगार सेवकाच्या वैयक्तिक खात्यावर मानधन जमा होणे, ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता अल्प आहार मिळावा तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ग्रामरोजगार सेवकांना कमी करणे विषयी कोणताच शासकीय परिपत्रक किंवा शासन निर्णय नसताना विनाकारण वेठीस धरणे नियमबाह्य पद्धत बदलविण्यात यावी यासह विविध मागण्यासंदर्भात आज एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले.

याप्रसंगी शिरीष चौधरी यांनी उपोषणकर्ते यांची उपोषणास्थळी भेट देवुनजाणुन घेतल्या व ग्राम रोजगार सेवकांचे पूर्ण माहिती निशी डॉक्युमेंट आपल्याकडे आपण सादर करावीत तेव्हा आपल्याला मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडे करून रोजगार सेवकांना कायम सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात येईल असे उपोषणकर्त्यांना सांगितले.

उपोषणास्थळी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी ही भेट देवुन रोजगार सेवकांच्या मांगण्या व समस्या आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पोहोचू व आपल्याला न्याय देण्याचा परी पूर्ण प्रयत्न करू असे सांगीतले.

सदर उपोषणास यावल रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी ,जिल्हा परिषदचे गट नेते प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष एडवोकेट देवकांत पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या व ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या संदर्भात माहीती जाणुन घेतली व आपला पाठींबा दिला. सदर एकदिवसीय लाक्षणिक  उपोषणात ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष खुशाल पाटील, उपाध्यक्ष बाळू तायडे सचिव ईश्वर अडकमोल, कैलास चौघरी , अमृत बाविस्कर , लक्ष्मण स्पकाळे , दिलीप तायडे , सरफराज तडवी , वसीम पिंजारी ,लुकमान तडवी, राजेन्द्र पाटील , मेहरबान तडवी, घन:शाम पाटील , विलास पाटील , मोहम्मद तडवी यांच्यासह तालुक्यातील इतर रोजगारसेवकांनी उपोषणात सहभाग घेतला .

 

 

Protected Content