घर घेण्यासाठी विवाहितेला १५ लाखांची मागणी; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या विवाहितेला हुंड्यासाठी मुंबईच्या सासर मंडळीकडून घर घेण्यासाठी १५ लाख रूपयांची मागणी करत छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की, यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या स्नेहा शोबन बडगुजर (वय-३०) यांचा विवाह नेरूळ, मुंबई येथील शोबन वासुदेव बडगुजर यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता. लग्ना नंतर विवाहीता सासरी नांदत असतांना काही दिवसांनी सासरच्या मंडळीची वागणुक ही अचानक बदलली. किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात केली.  नंतर माहेरहून घर घेण्यासाठी १५ लाखांची मागणी केली. नाहीतर घटस्फोट देण्याची धमकी देणे सुरू झाले. शिवाय सायसू, सासरे, दिर, चुलत सासरे, मावस सासरे यांनी देखील फोन करून धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. बुधवारी १२ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती शोबन वासुदेव बडगुजर, सासरे वासुदेव लक्ष्मण बडगुजर , सासु सरीता वासुदेव बडगुजर , दिर जतीन वासुदेव बडगुजर , चुलत सासरे अविनाश लक्ष्मण बडगुजर , मावस सासरे प्रदीप रघुनाथ बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Protected Content