मनवेल येथील अंगणवाडीत गरोदर महीलांसाठी स्तनपान सप्ताहनिमित्त मार्गदर्शन

yawal news

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावातील अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. स्तनदा मातांना उपमा, शिरा, सातूचे पिठ, मोडाची मटकी, पालेभाज्या, केळी, अंडी, भात, दुध, डाळींब, काकडी, असा पुर्ण सात्विक आहार तयार करण्‍याबाबत गरोदर व प्रसुती झालेल्या महीलांना मार्गदर्शन करुन त्यांना आहाराबाबतचे फायदे यावेळी मार्गदर्शनातुन सागण्यात आले.

किशोरवयीन मुली व स्तनंदा माता यांना मार्गदर्शन करुन योग्य आहार घेतल्यास त्यांच्या आहारात सुधारणा होण्यास मदत होईल.  नेकवेळा महिला नेलेला आहार घेत नसल्याने बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत होता दिसत आहे. असे यावेळी मार्गदर्शन करताना आशा स्वंयमसेविका सौ.रंजना कोळी सांगितले. दगडी येथील अंगणवाडी क्रमांक 5 येथील कीशोरवयीन मुली व महिलांना या मार्गदर्शन साठी या स्तनपान सप्ताह च्या एकत्रीत करण्यात आले होते.

यावेळी अंगणवाडी सेवीका कल्पनाबाई पाटील, प्रमिलाबाई कोळी, विमलबाई सपकाळे, अलकाबाई इंधाटे, ज्योती इंधाटे, ज्योति मोरे आदी महिला व विद्यार्थीनी उपस्थीत होत्या. शासनाचे वतीने प्रत्येक अंगणवाडी मध्ये महिला व भविष्यातील पिढी निरोगी व आरोग्यमय करण्याचे काम सुरु आहे. १ ऑगष्ट ते ७ ऑगस्ट स्तनपान सप्ताह परिसरातील महीलांच्या मोठया उपस्थित विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

Protected Content