‘आपली पेन्शन आपल्या दारी’ योजना प्रभाविपणे राबवा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत १०० टक्के लाभार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप प्रभाविपणे राबविण्यात यावे. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, “विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य या योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरूवार, दि. 16 जून रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव जिल्हयात 1 जुलै, 2022 पासून  विशेष सहाय्य योजनेच्या 100% लाथार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करण्याचे आहे.

ही योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी गावनिहाय विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची याबाबत तलाठी व इंडिया पोस्ट बॅकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी गावात बैठक घ्यावी. लाभार्थ्याना सदर योजना समजावून सांगावी. अशादेखील सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!