जळगाव प्रतिनिधी । हॉटेलमध्ये विनापरवानगी देशी दारुची विक्री करणार्यांवर तालुका पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून २ हजार ६५० रुपयांची देशीदारु जप्त करण्यात आली असून दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदाकडून भोकर जाणार्या रस्त्यावरील आसोदा गावाजवळ असलेल्या हॉटेल जत्रामध्ये पंकज वासुदेव पाटील (वय ३३, रा. चौघुले प्लॉट) हा विदेशी व देशी दारुची विक्री करीत असल्याने तालुका पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. यात त्याच्याकडून १ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर दुसर्या धाडीत या हॉटेलजवळ असलेली दुसरी हॉटेल ऋषभ मध्ये दिलीप सुकलाल कोळी (वय ५४, रा. आमोदे खुर्द ता. जि. जळगाव) हा विनापरवानगी देशी व विदेशी दारुची विक्री करीत होता. पोलिसांनी या ठिकाणी देखील धाड टाकीत येथून १ हजार ५३० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच पंकज वासुदेव पाटील (वय ३३, रा. चौघुले प्लॉट) व दिलीप सुकलाल कोळी (वय ५४, रा. आमोदे खुर्द ता. जि. जळगाव) या दोघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विश्वनाथ गायकवाड व हरीलाल पाटील हे करीत आहे.