मोबाईल व रोकड लांबविणाऱ्याला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील अयोध्या नगरात राहणाऱ्या तरुणाचे घरातून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ४० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल लांबविण्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आले आहे. असफर शेख कुढारक रा. चेन्नई तामिळनाडू असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश संतोष बोरसे वय 39 रा. गणपती मंदिराजवळ अयोध्या नगर जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता सुमारास तरुण हा बाहेर गेलेला असताना संशयित आरोपी असफर शेख पुढारक हा घरात घुसून घरातील दोन मोबाईल आणि रोकड असा एकूण ४० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निलेश बोरसे यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी संशयित आरोपी असफर शेख पुढारक याला पोलीसांनी अटक केली आहे. निलेश बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.

 

Protected Content