मरीमाता मंदीराच्या जिर्णोध्दाराच्या कामाला सुरूवात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील तेली तलाव परिसरात आलेल्या ग्रामदैवत मरीमाता मंदीराच्या जिर्णोध्दारचे काम श्री मरी माता मंदिर संस्थानने हाती घेतले आहे. हे मंदीर इंग्रजांच्या काळातील १९८ वर्षांपुर्वी बांधण्यात आले आहे. आता मरीमाता मंदीराचे जिर्णोध्दार व बांधकामासाठी भाविकांनी दान स्वरूपात सहकार्य करण्याचे आवाहन श्री मरी माता मंदिर संस्थानचे सदस्य रमेश चौधरी यांनी मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता केले आहे.

धरणगाव शहराचे ग्रामदैवत म्हणून मरीमाता मंदीराकडे पाहिले जाते. हे मंदीर इंग्रजांच्या काळात १८२५ मध्ये बांधण्यात आलेले आहे. याला आता १९८ वर्ष पुरातन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मरीमाता मंदीर परिसरात यात्रा भरविली जाते. या ठिकाणी कुस्त्यांची दंगल देखील घेतली जाते. शिवाय देवी मरिमाता ही नवसाला पावणारी असल्याने जिल्ह्यातील भाविक हे श्रावण महिन्याच्या दर मंगळवारी दर्शनासाठी गर्दी करतात. दरम्यान, हे मंदीर पुरातन असल्याने श्री मरी माता मंदिर संस्थानच्या वतीने मंदीराचे जिर्णोध्दार व मंदीर बांधकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जिर्णोध्दार व मंदीराच्या बांधकामासाठी सरळ हाताने दान स्वरूपात मदत करावी असे आवाहन श्री मरी माता मंदिर संस्थानचे सदस्य रमेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content