Home Cities जळगाव सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम ९ डिसेंबरला होणार

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम ९ डिसेंबरला होणार

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सशस्त्र सेना ध्वजदिन- २०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येणार आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी १०:०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

तरी जिल्हयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वीर पत्नी, वीर माता-पीता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबीत यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन- २०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन जळगावचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ निलेश प्रकाश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound