तलाठ्याशी वाद घालत वाळूने भरलेले ट्राली सोडून, ट्रॅक्टर घेवून पसार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना तलाठ्याशी वाद घालत दोघांनी ट्रॉली सोडून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटन गुरुवार, २ मे रोजी सकाळी १० वाजता जळगाव ते कानळदा रस्त्यावरील नवीन पुलाजवळ घडली आहे. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव ते का‌नळदा रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक सुरू असताना तलाठी राहुल अहिरे यांनी गुरूवार २ मे रोजी सकाळी १० वाजता विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर अडविले. त्यात दीड ब्रास वाळू आढळून आली. त्याविषयी परवान्याची विचारणा केली असता चालकाकडे परवाना नव्हता. त्या ठिकाणी आणखी एक जण आला व त्याने तलाठी अहिरे यांच्याशी वाद घातला. चालक व वाद घालणारा ट्रॉली तेथेच सोडून ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. या प्रकरणी तलाठी राहूल अहिरे यांनी रात्री ८.३० वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रॅक्टर वरील अनोळखी चालक व मालक निरज नितीन खैरनार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहेत.

Protected Content