एरंडोल प्रतिनिधी । जुने धारागीर परिसरातील अंजनी धरणाला लागून असलेल्या भगतवाडीला लागून असलेल्या एमएसईबी सबस्टेशनजवळील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेपासून नांदखुर्द गावापर्यंत डांबरी रस्त्याचे काम सुरू असताना पुरातन शंकराची पिंड व पुरातन अवशेष मिळून आले. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली.
याबाबतची माहिती संबंधित ठेकेदार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस संदिप वाघ यांना फोनवरून कळविली. त्यानंतर संदिप वाघ यांच्यासोबत उज्वल पाटील, सचिन पाटील, ठेकेदार हेमंत पाटील, जेसीबी चालक कैलास कुंभार यांच्यासह इतर नागरिकांनी सदरची मूर्ती वसंत सहकारी साखर कारखाना येथील श्रीदत्त मंदिरात आणून तिची विधिवत पूजा करून ही मुर्ती भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.