निंभोरी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरी खु” येथील शेतकरी संदीप मोराणकर यांच्या शेतावर राज्य शासनाचा कृषी विभाग व राशी सिड्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ अधिकारी एम. बी. मोरे, ए. पी. पाटील, राशी सिडसचे एरिया मॅनेजर समाधान खैरनार, तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मदन वजीर तडवी, माजी सरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप धुमाळ, कांताबाई चंदने, बचतगटाच्या समन्वयका अरुणा नितीन दिवटे, पोलीस पाटील संजय चंदने, माजी सरपंच प्रल्हाद शेळके होते. 

या कार्यक्रमात मंडळ अधिकारी एम. बी. मोरे यांनी खरीप हंगामापूर्वी करावयाची मशागती विषयी सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिनाच्या आतच कापसाच्या पराठया काढून त्या जागेवरच जाळून जमिनीची तातडीने खोल नांगरणी केल्यास पुढील वर्षात बॉंडाळीचा प्रादुर्भाव कमी होऊन जमीन तापल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडते. यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी एप्रिल व मे अखेर पर्यंत कापसाचे फरदड घेण्याच्या नांदी लागू नये.

तर राशी सिडसचे एरिया मॅनेजर समाधान खैरनार यांनी खान्देशात सुमारे ६५ टक्के कापसाचे पीक घेतले जात असल्याने या पिकांना लागणाऱ्या १४ प्रकारच्या अन्न द्रव्यविषयी सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातच कापसाची लागवड करावी. कापूस लागवडीनंतर पिकाच्या वाढीनुसार पाणी देण्याविषयी माहिती देऊन फल धारनेपासून तर कापूस वेचणीपर्यंत घ्यावयाच्या काळजी विषयी सखोल माहिती देत प्रत्येक शेतकऱ्याने तीन वर्षांनंतर माती व पाणी परीक्षण करून घेणे व त्यानुसारच पिकांची निवड करन्याविषयी सूचना केल्या.

या कार्यक्रमास शेतकरी कैलास पाटील, भगवान राउतराय, संजय शेळके, प्रवीण मोरे, सोनिराम शेळके, शरद शेळके, बाळकृष्ण धुमाळ, दिलीप शेळके, महेंद्र राऊतराय, दिगंबर राठोड, महिला बचत गटाच्या सरिता राजेंद्र चंदने, कांचन गजानन नलावडे, तुळसाबाई चंदने, कविता खासेराव, अमृता तडवी, वंदना खासेराव, हिराबाई नलावडे, छायाबाई नलावडे, कृषी सहायक यु वी पाणपाटील, ए एस पाटील, एल वि देवरे, डी. डी. पाटील, स्नेहल पटवर्धन, प्रोजेक्ट डायरेकटर अभिमन्यू पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन यु. वि. पाणपाटील यांनी केले.

 

Protected Content