नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । खो-खो विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतात पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक स्पर्धेत दोन्ही संघांनी आपल्या कौशल्याचा परिचय देत दमदार विजय मिळवला.
दिल्ली येथे केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी या विजयी खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. रक्षाताई खडसे म्हणाल्या की, “या विजयामुळे देशातील क्रीडा संस्कृतीला नवी चालना मिळेल आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तमाम भारतवासियांना आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे.” या विजयाने भारताच्या क्रीडा क्षेत्रात नवीन अध्यायाची सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.