भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वाडे येथील नेताजी सुभाषग्राम वाचनालयात भारताच्या महान स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. वाचनालयाचे संचालक आणि पत्रकार अशोक परदेशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे वाचनालयाचे पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांनीही पूजन करून नेताजींना अभिवादन केले. नेताजींच्या देशप्रेम आणि त्यागमय कार्याची आठवण करून देण्यासाठी वाचनालयात विविध चर्चा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पतिंगराव पाटील यांनी केले. यावेळी वाचनालयाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन शामराव माळी, संचालक हिलाल चौधरी, नामदेव महाजन, दिलीप मोरे, अशोक परदेशी, सचिव ओंकारदास बैरागी यांच्यासह ग्रंथपाल देविदास पाटील आणि वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाचनालयातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.