चोपडा येथील श्री संत सावता माळी युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

चोपडा प्रतिनिधी । येथील राजेंद्र महाजन यांची श्री संत सावता माळी युवक संघाच्या जळगाव जिल्हा संघटकपदी, प्रशांत रघुनाथ महाजन चोपडा तालुका शिक्षक आघाडी, मुकेश महाजन आणि रामलाल माळी चोपडा तालुका सदस्यपदी निवड करण्यात आली.

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड, प्रदेशाध्यक्ष  जितेंद्र महाजन,  प्रदेश प्रवक्ता अजिंक्य फुले, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, खान्देश विभागीय अध्यक्ष संजीवकुमार, खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी, प्रभारी जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश माळी यांचा मार्गदर्शनाखाली निवड झाली.

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात श्री संत सावता माळी युवक संघा च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे शहराध्यक्ष रोहीत माळी, शहर उपाध्यक्ष विठ्ठल माळी, तालुका उपाध्यक्ष अरुण माळी, तालुका कार्यध्यक्ष नरेंद्र माळी तसेच युवक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content