मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण उर्फ बबलू सापधरे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर येथील माजी सरपंच तथा माजी ग्रामपंचायत सदस्य कै. रमेश देवचंद सापधरे यांचे चिरंजीव लक्ष्मण रमेश सापधरे यांची राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. लक्ष्मण रमेश सापधरे उर्फ बबलू हे सामाजिक व सर्वांच्या सुख-दुःखात धावणारे व मुक्ताईनगर येथील प्रवचन चौकामध्ये मागील सहा वर्षापासून मुक्ताईनगर मधील प्रवर्तन चौका मधील दररोज होणाऱ्या राष्ट्रगीताचा आयोजन करणारे व प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मित्राची जागा निर्माण करणारे असे एकमेव कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यांच्या मुक्ताईनगर शहराध्यक्षपदाचा भरपूर फायदा होईल असा त्यांना विश्वास आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.