शेतकरी संघटना जिल्हाध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विषय चांगल्याप्रकारे हाताळल्याने कामाची दखल घेत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे पाटील यांनी पारोळा येथे येऊन किशोर पाटील यांची शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पदावरून जळगाव जिल्हा पश्चिम जबाबदारी देत जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.              

शेतकऱ्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे. शेतमालाला रास्त भाव यासाठीचे काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करीत असल्याचे गौरव उद्गार काढत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे पाटील यांनी काढत किशोर पाटील यांची शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी ललित बहाळे पाटील विभागीय अध्यक्ष श्री. भदाणे, भिकनराव पाटील, निलेश चौधरी, दत्तू पाटील आदी पदाधिकारी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content