Home Agri Trends अधिसूचित पिकांचे काढणीनंतर नुकसान झाल्यास कळविण्याचे आवाहन

अधिसूचित पिकांचे काढणीनंतर नुकसान झाल्यास कळविण्याचे आवाहन

0
25

जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 च्या खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत असून 72 तासांच्या आत कृषी विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

या योजनेंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबीकरीता ज्या पिकांची कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (14 दिवस ) बिगर मोसमी आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन  निकषांचे अधिन राहुन नुकसान भरपाई  निश्चित केली जाते.  पीक  विमाधारक शेतकऱ्यांच्या अधिसुचित पिकांचे काढणीनंतर नुकसान झाले असल्यास 72 तासांच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकाव्दारे, मोबाईल ॲपव्दारे, ई –मेलव्दारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईनव्दारे देणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Protected Content

Play sound