लोकशाही दिनात प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव प्रतिनिधी | लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावेत, त्यांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे म्हणून दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक मकसूद बशीर शेख, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, विशेष भूसंपादन अधिकारी किरण पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, “जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींच निराकरण झाले पाहिजे. तशी भूमिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच आस्थापनाविषयक बाबी नागरिकांनी लोकशाही दिनात दाखल करु नये” असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी केले.

आजच्या लोकशाही दिनी ११ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यात विशेष भूसंपादन अधिकारी जळगाव -२, महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव – २, जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, जळगाव -३, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव – १, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कं. जळगाव – १, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा – १, संजय गांधी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय – १ याप्रमाणे एकूण ११ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

Protected Content