भुसावळात कोरोना रूग्णालयाकडून जादा बिलाची आकारणी; पडताळणीनंतर रूग्णाला मिळले पैसे परत

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना संक्रमित रुग्णांकडून कोवीड रुग्णालयातर्फे उपचारासाठी शासकीय दरानुसार बिल न आकारता रुग्णांची लूटमार होत आहे, दरम्यान, आज भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीच्या बिल पडताळणी समितीच्या पाठपुराव्याने रुग्णाला 18 हजार 800 रूपये परत मिळाले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ येथील रहिवासी कौलसिंग पाटील आणि वत्सला पाटील हे कोरोना संक्रमण झाल्याने  १ ते ५ एप्रिल २०२१ या काळात श्री मल्टीस्पेशालीटी क्रिटिकल केअर सेंटर संचलित श्री रिदम कोविड केअर हॉस्पिटल, भरती होते, उपचाराअंती कौलसिंग पाटील हे मयत झाले तर वत्सला पाटील या सुखरूप घरी आल्या. या ५ दिवसामधील त्यांचे बिल अनुक्रमे ५० हजार ५७१ आणि ४० हजार ९०१ असे होते. या दोघांचे ९१ हजार ४७२ बिल अदा करण्यात आले. घरचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर त्यांनी भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीचे केतन पाटील यांच्याशी वाढीव बिलासंबंधी विचारणा केली असता त्यांनी लेखी तक्रार करोना योद्धा सहाय्य समितीचे अध्यक्ष डॉ. नि.तु पाटील यांच्याकडे करत सर्व कागदपत्रे सोबत दिली.

डॉ. नितु पाटील यांनी सदर वाढीवबील अर्जाचा पाठपुरावा जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सुरु केला.याबाबतील भुसावळ तालुक्याचे आ.संजयजी सावकारे यांना पण अवगत करत त्यांनी पण आक्षेप निवारण समिती जळगाव यांच्याशी चर्चा करत बिल पडताळणीच्या सुचना दिल्यात. अखेर करोना योद्धा सहाय्य समितीचे केतन पाटील यांच्या उपस्थितीत पाटील परिवाराला अनुक्रमे ९ हजार आणि ९ हजार ८०० या रकमेचे दोन चेक द्वारे पैसे परत करण्यात आले. याबद्दल पाटील परिवाराने भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीचे आभार मानले आहे.

बिल पडताळणीसाठी आवाहन
“श्री मल्टीस्पेशालीटी क्रिटिकल केअर सेंटर संचलित श्री रीदम कोविड केअर हॉस्पिटल, बददल अजूनही ३,४ तक्रारी बददल पाठपुरावा सुरु आहे.ज्या रुग्णांना वाढीव बिलासंबंधी काही तक्रार असल्यास त्यांनी करोना योद्धा सहाय्य समितीच्या कोणत्याही सदस्याशी संपर्क साधावा. भारतीय जनता पार्टी याबद्दल पाठपुरावा करणार.”
डॉ. नितु पाटील, अध्यक्ष, कोरोना योद्धा सहाय्य समिती, भुसावळ

Protected Content