भौतिक साधनांचा अतिरेकी वापरच नकारात्मक वृत्तीस वाढीस लावतो : ब्र.कु. मिनाक्षीदीदी

जळगाव (प्रतिनिधी) आज सर्व जग साधनांच्या अधिन झालेले असून स्व-साधना विसरलेले आहे. त्यास कारण भौतिक साधनांना अतिरिक्त महत्व देणे होय. साधने वापरा परंतु त्यांना मानवीय संवेदनांपेक्षा जास्त महत्व देऊ नका हीच सकारात्मक जीवन शैलीची गुरु किल्ली होय. त्यासाठी राजयोग ध्यानाभ्यास अत्यंत लाभदायी ठरते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळेत ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मेडिटेशन वर्कशॉप फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स या उपक्रमातर्गत शासकीय अधिकारी व कर्मचा­यांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचा­यांचे मानसिक बळ वाढविणे हे प्रमुख उद्देश होता.त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले गेले. त्याचच एक भाग म्हणून स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र आणि शासनाच्या वैद्यकिय विभागामार्फत सदरहू कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मुख्य वक्ता मिनाक्षीदीदी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने मेडिटेशनद्वारे गहनशांतीचा अनुभव करुन दिला. ज्यायोगे दैनंदिन जीवनातील धावपळीपासून काही क्षण का असेना तणावमुक्तिचा अनुभव घेतला.

महाराष्ट्रात सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. जळगाव तालुका स्तर कार्यशाळा पंचयायत समिती कार्यालय येथे घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शन राजयोग शिक्षीका ब्र.कु. मिनाक्षीदीदी यांनी केले. याप्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मनोहर बावणे यांनी उपस्थितांना मागदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजनास डॉ. संजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी यांनी मदत केली.

कार्यशाळेसाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. उमेश तागडे, सहा. संचालक (आयुष), राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागाचे डॉ. सचिन परब, मुंबई,डॉ. कमला पूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सोमनाथ वडनेरे, ब्रह्माकुमारीज् जळगाव यांचे सदरहू कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी ब्र.कु. दिपा, ब्र.कु. भाग्यश्री यांनी राजयोग अभ्यास करवून घेतला. कार्यशाळेस सुधाकर शिंपी, राजेश अट्टल, प्रफुल्ल भोसले यांचेही सहकार्य लाभले.

Add Comment

Protected Content