कोरोनाचा स्फोट : जिल्ह्यात आज उच्चांकी १०९० रूग्ण ! : जळगावात ४४४ पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या Jalgaon Corona News Today संसर्गाचा भयंकर स्फोट झाल्याचे आज दिसून आले असून जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये तब्बल १०९० रूग्ण आढळून आले आहेत. ही आजवरच्या एका दिवसातील रूग्णांची उच्चांकी संख्या असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. तर जळगाव शहरातील संसर्ग सर्वाधीक असल्याचेही दिसून आले आहे.

संसर्ग भयावह पातळीवर

प्रशासन जनता कर्फ्यू, लॉकडाऊनसह अनेक प्रयत्न करत असले तरी आता कोरोनाचा Jalgaon Corona News Today संसर्ग अतिशय भयावह पातळीवर पोहचल्याचे दिसून आले आहे. आज सायंकाळी प्रशासनाने पाठविलेल्या रिपोर्टमधून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

दिलासा देणारी बाब

जिल्हा प्रशासनाच्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये तब्बल १०९० पेशंट आढळून आले आहेत. ही एकाच दिवसात आढळून आलेल्या रूग्णांची आजवरची सर्वाधीक संख्या आहे. आजवर एक हजाराच्या आतच रूग्ण आढळून आले असतांना आज ही मर्यादा देखील क्रॉस झालेली आहे. दरम्यान आजच ९०७ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची बाब त्यातल्या त्यात दिलासा देणारी आहे.

जळगाव शहरात सर्वाधीक पेशंट

आज जळगाव शहरात सर्वाधीक म्हणजे तब्बल Jalgaon Corona News Today ४४४ पेशंट आढळून आले आहेत. शहरच्या सर्व भागांमधील हा संसर्ग असल्याचे रिपोर्टमधून दिसून आले आहे. याच्या खालोखाल भुसावळात ११९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका-३६; अमळनेर-५०; चोपडा-७६; पाचोरा-२६; भडगाव-१४; धरणगाव-६१; यावल-१७; एरंडोल-४०; जामनेर-६९; पारोळा-१७; चाळीसगाव-५६; मुक्ताईनगर-४२; बोदवड-९ आणि इतर जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील मृत रूग्णांचा आकडा पंधराशेच्या पार

आज जिल्हाभरात ११ कोरोना बाधीत रूग्णांचे मृत्यू झालेले असल्याची बाब देखील चिंताजनक अशी आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण मृत झालेल्या रूग्णांचा आकडा पंधराशेच्या पार म्हणजे १५०१ इतका पोहचला आहे. तर जिल्ह्यात आज ७१७ रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात आलेला असून ३१६ रूग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज एकूण ९८७३ इतक्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४८६ रूग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तर २३८७ रूग्णांना मात्र लक्षणे जाणवत असल्याची माहिती आजच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे. जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा, जामनेर, एरंडोल, धरणगाव आदी शहरांमध्ये अलीकडच्या काळात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या लक्षणीरित्या वाढीस लागलेली आहे. यातील काही शहरांमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आलेला असला तरी याचा कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येवर जराही परिणाम झाला नसल्याचे आज पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

Protected Content