धनाजी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

dhanaji colloge

फैजपूर प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयात सण महोत्सव समितीतर्फे आज दि. 1 ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी होते. महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहाय्यक प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी साहित्यातील योगदानाचा परिचय श्रोत्यांना करून दिला. त्यांनी मराठी तील विविध साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन केले असून त्यांनी सामान्य कष्टकरी शेतमजूर कामगार यांच्या प्रश्नांना आपल्या साहित्यातून वाचा फोडला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ते एक अग्रण्य नेते होते. म्हणूनच लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली होती. त्यांनी आपल्या साहित्यातून जगण्यासाठी मरणाऱ्या माणसांची कथा लिहिली त्यांच्या साहित्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. म्हणूनच त्यांचा सत्कार रशियाच्या पंतप्रधानांनी केला. त्यांचे अतिशय सकस मराठी साहित्य जगातील 27 भाषांमध्ये रूपांतरित झाले आहे.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी केला त्यामध्ये त्यांनी या दोन्ही महापुरुषांचे जीवन अतिशय प्रेरणादायी असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कोणकोणते गुण आपल्याला आत्मसात करून आचरणात आणता येतील, यासाठी श्रोत्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सण महोत्सव समितीचे चेअरमन डॉ.आय.पी.ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन समिती सदस्य प्रा.डॉ.नितीन चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content