जळगाव तुषार वाघुळदे । ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ गाण्याने जगभर पोहचलेला पण जमिनीवर घट्ट पाय रोवून असणारा लोक कलावंत अण्णा सुरवाडे यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून नवीन १० गाणी कंपोज केली असून काही चित्रपट व अल्बममध्ये त्याला संधी मिळाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील एक चित्रपट दिग्गज जोडी अजय-अतुल यांच्या सोबतचा आहे. या संदर्भात अण्णा सुरवाडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या असता त्याने आपल्या आजवरच्या वाटचालीचा पट उलगडून दाखविला.
व्हिडीओसह सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
जळगाव जिल्ह्याला एक वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. या जिल्ह्याने अनेक प्रतिभावंत दिलेत, हा इतिहास आहे. कुठलंही योग्य मार्गदर्शन नसताना जामनेर तालुक्यातील वाकी येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठीचा संघर्ष करीत सुप्रसिद्ध गायक, गीतकार आणि लोककलावंत अण्णा सुरवाडे यांनी अनेक सरस अल्बमची निर्मिती करून आपल्या कलेच्या विश्वात सर्वत्र डंका वाजविला असून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे, ही बाब अभिमानास्पद म्हणावी लागेल.
‘ बबल्या इकस केसावर फुगे ‘..या गाण्याने तर महाराष्ट्रच नाही तर विविध राज्य व सातासमुद्रापार धम्माल केलीय. अण्णा सुरवाडे हे नाव सर्वांच्या मुखी परिचित झालेय. मामा ‘ तुमची मुलगी लय सुंदर ‘ , ‘ टम टम चाली राह्यनी ..भडगाव जायी राह्यनी ..’ ,’जानू आय लव्ह यू ..सोनू मिस यू’..,’ बाई या कोरोनापाई वं ‘.. ‘ माझ्याशी लगन करशील का ‘ ? ‘ प्रेमाचा डंका गाजू लागला ‘ , ‘ बाबूलाल इकस बुढिके बाल ‘ ,’ तुझं कॉलेज सुटल्यावर गार्डनला येऊन आय लव्ह यू बोल ग ‘. राजे सोंग, ‘ भजन.’ माझ्या लाडाची चिकू , जरा दे मला मुकू ‘..!
भीमसागर ,’ संविधानाचा शृंगार ‘, गोट्यानं लगीन यासह जवळपास 85 च्या वर अनेक गाणी यू ट्यूबवर सध्या वाजत असून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केसावर फुगे आणि मामा तुमची मुलगी लय सुंदर ..! ही गाणी तर सुपरहिट ठरली असून ” केसावर फुगे “… चे तर 20 जुलै 2020 पर्यन्त चक्क साडेअठरा कोटीपर्यन्त व्ह्यूज झाले आहेत, ही बाब आश्चर्याची व थक्क करणारीच आहे. प्रचंड पसंती या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी दिलीय.अण्णा तसा एक साधा सरळ , कमी बोलणारा आणि कलेत बेधुंदपणे रमणारा एक ध्येयवादी लोककलावंत …!
एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्याशी अत्यंत दिलखुलासपणे संवाद साधला..मी लहान असताना जुने चित्रपट बघत गाणे गुणगुणत असायचो.आपणही गाऊ शकू का ? आपले स्वप्न पूर्ण होईल का ? काय असते हे अफलातून विश्व हे अजमावण्याचा प्रयत्न केला.घरची परिस्थिती अत्यंत बिकट , आई वडील मोलमजुरी करीत. वाकी हे गाव तसं खूप छोटं , आडवळणाचे आणि दुर्गमही ..!! कसे बसे शालेय शिक्षण घेऊन जळगांव गाठले .एम.जे.कॉलेजमध्ये बी.ए. म्युझिक केले.कासार सर आणि संजय पत्की यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले..मुंबई गाठली .खूप भटकलो …फिरकत फिरकत पुन्हा गावी आलो..गावात कोणाकडे ही लग्न असले की, मी बँडवर गात असे.चाळीस – पन्नास रुपये तर कधी शंभर रुपये मिळायचे त्यातच मी शिक्षण पूर्ण केले.कुठल्याही विषयावर पथनाट्य करीत गेलो. विनोद ढगे यांचे मार्गदर्शन यासाठी मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मित्रांना सोबत घेऊन शॉर्ट फिल्म काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कॉलेज सुटल्यावर आय लव्ह यू .. म्हणशील का ? हा माझा पहिला अल्बम काढला नि ती राज्यात चांगलाच गाजला..माझा उत्साह वाढला व मी जिद्दीने , धाडस करून काहीतरी प्रयोग करीत गेलो असे सुरवाडे म्हणाले.कुमावत यांची खूप मदत मिळाली.त्यांनी रेकॉर्डिंग ला बोलविले ..पुढे निरंतर कलेचा प्रवास सुरूच आहे.आज आधुनिकीकरण्याच्या वरवंट्या खाली प्रादेशिक भाषा मायबोली कुठेतरी लोप पावते की काय ,असे वाटू लागल्याने , तसेच खान्देशात अहिराणी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने मी या भाषेला प्राधान्य देत गेलो आणि लोककला समृद्ध करीत माझा प्रयत्न सुरू ठेवला आहे .रसिक- प्रेक्षकांना जे आवडेल ते देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न भविष्यातही राहील असे अण्णा सुरवाडे यांनी मोकळेपणाने सांगितले.
लॉक डाऊनच्या काळात 10 नवीन गीतं लिहून कंपोज देखील केली आहेत. रसिक , चाहत्यांना ती लवकरच ऐकता येतील.त्यात ‘ प्रेमावर आधारित ” तुफान असं आलं ग ” हे गाणं युवक- युवतींच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त करीत अण्णा सुरवाडे उल्हासित होऊन आगामी प्रोजेक्टबद्दल म्हणाले , ‘ आमदार निवास ‘ या बिगबजेट चित्रपटात नामांकित अभिनेते आहेत , कसदार अभिनय असलेला सयाजी शिंदे , सुप्रसिद्ध अभिनेत्री आयटम गर्ल सनीलिओन , नागेश भोसले यासह अनेक दिग्गज कलाकार यात असणार आहेत.संजय राठोड हे निर्माता व दिग्दर्शक आहेत.सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांचं संगीत असणार आहे. माझ्यासोबत गायिका वैशाली माळी , आनंद शिंदे , आदर्श शिंदे यांनी ही गाणी गायली आहेत हे विशेष . ! असेही त्यांनी सांगितले.सहा ते सात महिन्यात हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मला हवे फक्त सर्वांचे पाठबळ , आशीर्वाद ..! यावरच मी उत्तुंग यश गाठू शकतो असेही अण्णा सुरवाडे या कलावंताने सांगितले.
खालील व्हिडीओत पहा अण्णा सुरवाडे यांची मुलाखत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2662902733979398/