जळगावात जी. एम. फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील जी.एच. रायसोनी कॉलेजच्या वसतीगृहात आजपासून जी. एम. फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले. माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात आले.

शहरापासून जवळच असलेल्या जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जी. एम.फाऊंडेशन मित्र परिवारतर्फे ३०० पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, आ. राजूमामा भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, नंदू अडवाणी, श्रीराम खटोड, मनोज काळे, डॉ. रितेश पाटील, अनिल पगारिया, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, पराग महाशब्दे आदी मान्यवर उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा आ. गिरीश महाजन यांनी दिलेली माहिती

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/287277352547781

Protected Content